ट्विटरची शब्द मर्यादा वाढली

0
272

 चौफेर न्यूज फेसबुक पाठोपाठ तितक्याच आग्रहाने सोशल मिडियात नाव घेतले जाते ते ट्विटरचे. कारण जी व्यक्ती फेसबुक सापडणार नाही ती व्यक्ती आपल्याला ट्विटरवर भेटणारच. निरनिराळे कलाकार, राजकारणी प्रतिष्ठित व्यक्ती यांना अनेक जण ट्विटरवर फॉलो करत असतात. फेसबुक वर आपण हव्या तितक्या शब्दांत व्यक्त होऊ शकतो, परंतु ट्विटरवर व्यक्त होण्यासाठी शब्दांची मर्यादा असते ही मर्यादा १४० शब्दांची असते. परंतु  बुधवारी ट्विटरनेच या संदर्भात एक नवे ट्विट केले आहे. आणि या ट्विटमध्येच ट्विटरने २२०-२२५ अक्षरांचा समावेश करून ट्विट केले आहे.

सध्या ट्विटरच्या ‘What’s happening’ च्या जागेमध्ये फक्त १४० शब्दांमध्येच लिहिता येत होते. परंतु यापुढे व्यक्त होण्यासाठी शब्दांची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. १४० वरुन २८० शब्द म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट शब्द संख्या केली जाणार आहे. त्यासाठी ट्विटरकडून प्रयोग सुरु झाले आहे.

या अगोदर देखील ट्विटरने शब्दांची मर्यादा वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग करून पाहिलेले आहेत. जपानी आणि इंग्रजी भाषेतील कॅरेक्टर्सच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करून ट्विटरने हा निर्णय घेतलेला आहे. ट्विटरच्या  निर्मिती व्यवस्थापक  असलेल्या आलिया रोझन यांनी ब्लॉग लिहून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

अनेकदा १४० शब्द अशीच ट्विटरच्या शब्दांची मर्यादा असल्याने इतर काही भाषा आहेत ज्यांमध्ये १४० शब्दांमध्येच व्यक्त होणं अनेकदा कठीण जात असे. जसे मराठीत काना, मात्रा, वेलांटी यांमुळे शब्दसंख्या कमी होते. त्यामुळे अनेकदा एक किंवा दोन ओळीतच ट्विटर वापरकर्त्याचे विचार हे ट्विट होत असे. कदाचित याच निरनिराळ्या भाषेतील कॅरेक्टर्सचा विचार करूनच ट्विटरने हा निर्णय घेतला आहे असे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =