चौफेर न्यूज – एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताने अधिराज्य गाजवले. आता ट्वेन्टी-२० मालिकेमध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी विराट कोहलीची युवा सेना सज्ज झाली आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. बुधवारी होणारी दुसरी एकदिवसीय लढत जिंकल्यास तीन सामन्यांची मालिका भारताला खिशात टाकता येणार आहे. दुसरीकडे यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिका वाचवण्याची ही अखेरची संधी असेल. कारण हा सामना गमावल्यावर त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

कसोटी मालिका गमावल्यावर भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांचा हाच फॉर्म ट्वेन्टी-२० मालिकेत पाहायला मिळाला. आतापर्यंत सातत्यपूर्ण धावा करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही आपली छाप पाडत आहे. विराट कोहलीही चांगल्या फार्मात आहे, पण अन्य फलंदाजांना मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही.  गेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने पाच बळी मिळवत दमदार कामगिरीचा नजराणा पेश केला होता. ही खेळपट्टी संथ होत जाणारी आहे. त्यामुळे या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळणार आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला अजूनही खेळवण्यात आलेले नाही, त्यामुळे संघ निवडताना त्याच्या नावाचाही विचार करण्यात येणार आहे.

दुसऱ्या स्थानाची संधी ….

आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाण्याची भारताला या मालिकेत संधी असेल. भारताने ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकली तर ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + eleven =