मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना इशारा

चौफेर न्यूज – छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे दृश्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे चित्रपटातून वगळण्यात यावे, अन्यथा 25 जानेवारीला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडने दिला आहे.

पुणे निवासी जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर.के. पद्नाभन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश काळे, धनंजय पवार, लक्ष्मण माने, तुकाराम पाटील, राजेश सामले उपस्थित होते. त्या निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे असून याविषयी शंका नाही, ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांची भुमिका साकारणारा अभिनेता नवाजूद्दीन सिध्दीकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पांढ-या रंगाचा चपला घालून पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. त्यामुळे आम्हा तमाम शंभुप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत.

सदरील दृश्य ठाकरे चित्रपटातून वगळण्यात यावे, अन्यथा 25 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही. तसेच संभाजी बिग्रेड या चित्रपटावर बहिष्कार टाकणार आहे. हा चित्रपट मालकांनी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर पुढील होणा-या परिणामास थिटर मालक जबाबदार राहितील, असा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − 4 =