चौफेर न्यूजसातपूर परिसरात असणाऱ्या डायनॅमिक कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून मॅनेजरला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र.126 वरील डायनॅमिक प्रा.लि. कंपनीतील कामगार सुरेश चव्हाण यास व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटीसीचा राग आल्याने चव्हाण याने कंपनीतील अधिकारी सचिन भीमराव दळवी यास लोखंडी रॉडने मारहाण केली. दळवी यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चव्हाण आणि सिंग या दोघा कामगारांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सदर कंपनीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांची महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेना युनियन कार्यरत आहे. व्यवस्थापनाला मारहाण करणाऱ्या दोघा कामगारांवर भादवी 323,324,506,34 अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 14 =