चौफेर न्यूज – एकही ग्राहक पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यास पुढे न आल्यामुळे त्यांच्यावरील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी डीएसकेंच्या बालेवाडी येथील जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विक्रीस काढली आहे.

बँकेने वृत्तपत्रातून याबाबत जाहीरात देवून इच्छुकांकडून निविदा मागवल्या आहेत. निविदा भरण्याची ७ मार्च अंतिम मुदत होती. ८ मार्चला निविदा उघडल्या जाणार होत्या. पण कोणीच डीएसकेंची ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी पुढे आलेले नाही. एकही निविदा न आल्याने बँकेने निविदा प्रक्रियेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बालेवाडी येथील मालमत्ता तारण ठेवून डीएसकेंनी सेंट्रल बँकेकडून कर्ज घेतले होते. सेंट्रल बँकेचे ७७ कोटी रूपये थकीत आहेत. तर या मालमत्तेची राखीव किंमत ६६ कोटी ३९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 3 =