चौफेर न्यूज पोलीस तपासात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढीच रक्कम असल्याचे समोर आले आहे. डीएसकेंना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांची विविध बँकेतील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ही बाब या खात्यांची तपासणी केल्यानंतर समोर आल्यामुळे डीएसके यांनी पैसा कुठे ठेवला, याचा तपास पोलीस घेत आहेत.

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी हे येरवडा जेलमधील न्यायालयीन कोठडीत आहेत. विविध बँकांचे कुलकर्णी यांनी कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्याकडे गहाण असलेल्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ५ हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी डीएसके यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची मालमत्ता आणि बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. डीएसकेंची हजारो कोटींची त्यात मालमत्ता ‘सील’ केली आहे. काही बँकांनी त्यांचे कर्ज थकविल्याने त्यांच्याकडे गहाण टाकलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे कामही सुरू केले आहे. परंतु, डी. एस. कुलकर्णी यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नव्हते.

३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक डीएसके ग्रुपकडून झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पण त्यांच्या बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढीच रक्कम आढळून आल्यामुळे डीएसके यांनी बाकीचा पैसा इतरत्र कुठे वळवला आहे का? याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 1 =