चौफेर न्यूजगुंतवणूकदारांचे पैसे देण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल केलेल्‍या दोषारोपपत्रात त्‍यांनी २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांनी हे दोषारोपपत्र चार गाड्यांमधून आणले असून, ते अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. याबाबत सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्‍यान, या घोटाळ्या प्रकरणी फायनान्स विभाग प्रमुख विनयकुमार बडगंडी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गेले काही दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडून डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील आरोपपत्राची तयारी  सुरु होती. अखेर पूर्ण छाननी केल्यावर आज(दि. १७ मे) त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + 2 =