चौफेर न्यूज – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांनी यांनी हायकोर्टाची फसवणूक केली हे आता उघड झाले आहे. त्यांच्याबाबत अंतिम निर्णय जरी २२ फेब्रुवारीला होणार असला तरीही त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण आम्ही आता दूर करतो आहोत असे म्हणत हायकोर्टाने आपला संताप व्यक्त केलआ आहे. एवढेच नाही तर डी. एस. कुलकर्णी यांनी त्यांचा पासपोर्ट जमा करावा असाही आदेश कोर्टाने दिला आहे. तसेच ते देश सोडून जाऊ शकत नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकांचे सोडून द्या आता कोर्टालाच डी. एस. कुलकर्णी यांच्यावर विश्वास नाही असे म्हणत कोर्टाने त्यांना फटकारले आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही त्यांचा जामीन अर्ज रद्द केला असता पण आम्हाला वाटले की डीएसके दिलेला शब्द पाळतील. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता लोकांचा काय आमचाच त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही असे कोर्टाने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत बांधकाम व्यावसायिक डीएसके ५० कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरले होते. त्यावेळी त्यांनी लिलावासाठी १२ कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे सादर केली होती. तसेच बुलडाणा अर्बन मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेने १०० कोटींचे कर्ज देण्याची तयारी दाखवली होती. मात्र या कर्जासाठी तुम्ही कागदपत्रांची योग्य छाननी केली आहे का? असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला आहे. एवढेच नाहीतर माध्यमांमध्ये जाऊन लोकांचा माझ्यावर विश्वास आहे हे डीएसके कोणत्या तोंडाने सांगतात असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.

एकवेळ भीक मागावी पण डीएसकेंनी लोकांचे पैसे उभे करावेत असे म्हणत याआधीच कोर्टाने डीएसकेंना फटकारले होते. तसेच लोकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात असेही कोर्टाने म्हटले होते. आज मात्र हायकोर्टाने डीएसकेंवर विश्वासच नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी फसवणूक केल्याचे म्हटले आहे आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − eleven =