चौफेर न्यूज –  सांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 13 एप्रिल) पिंपळे गुरव येथील सृष्टी हॉटेल जवळील जय भीम चौकात मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा भीम जलसा सादर करण्यात आला. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचे शिष्य निशांत गायकवाड, मुराद काझी, स्वप्निल पवार, अनिता इंगवले यांनी प्रबोधनातून गीते सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. गुरु शोभा सामाजिक व क्रिडा संस्था, आदियाल स्पोर्टस क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंग आदियाल, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेवक अंबादास कांबळे, संतोष कांबळे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप तसेच शाम जगताप, पिंटू जवळकर, विलास पाटील, मुकेश पवार, ‘फॅन्ड्री’चित्रपटातील कलाकार राजेश्वरी खरात आदींसह शेंकडो नागरीक उपस्थित होते. यावेळी की बोर्डवर सतिश कुमार, रिदम मशीन धम्ममित्र आव्हाड, ढोलक चंद्रकांत इंगवले, नृत्य लावणी सोनल पुणेकर, आरती सातारकर, वेस्टर्न शितल बालवडकर, निवेदन दिपक म्हस्के, साऊंड सुनिल पाटील यांनी साथसंगत केली. बुध्द वंदना, सोनियाची उगवली सकाळ, छाती ठोकून सांगू जगाला, भीमा मुळे अंगठी सोन्याची बोटाला, भीमराज की बेटी, कायदा लिहिला भीमाने या गीतानी वन्समोअर मिळविला. शनिवारी दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुशिक्षित तरुण, तरुणींसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याचा 450 गरजूंनी लाभ घेतला होता. तसेच 280 लोकांची सरकारी फी मध्ये पासपोर्ट नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करुन देण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनात नयन अहिरे, गणेश जगताप, नितीन कदम, अरुण पवार, अरविंद कसबे, अतुल काशीद, नितीन काशीद, मुकेश पवार, हुसेन मुलाणी आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + 7 =