चौफेर न्यूज –  घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त चिंचवड शाहुनगर येथील धम्मचक्र बुध्दविहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष सुरेश कसबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामुदायीक बुध्दवंदना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी व्याख्याने उपासक, उपासिकांनी दिली. तसेच यावेळी नालंदा फाऊंडेशनच्या वतीने धम्मचक्र बुध्दविहारात नियमित साप्ताहिक बुध्दवंदनेस हजर राहणा-या लहान मुला मुलींना पांढ-या ड्रेसचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने मोफत सेवा देणा-या नालंदा वधू वर सुचक मंडळाचे उद्‌घाटन सुरेश कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांचा खंजेरी वादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पी.जी.रंगारी, मनिषा कसबे, एस.एल. वानखेडे, मानसी वानखेडे, साहेबराव खरात, एस.के.गणवीर, सुर्यकांत दारोंडे, विजय कांबळे, सेवकराव फाले, मंगेश सोनकांबळे, प्रकाश जोगदंड, गोकुळ गायकवाड, सतिश कसबे, रामदास इंगळे, सतिश प्रगणे, राहुल गोरे, त्रिशरण गायकवाड, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − six =