साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री येथे शनिवार दि. २२ रोजी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनासाठी सत्यनारायणाची पुजा शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, सरिता सोनवणे या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती विसर्जनानिमीत्त सर्व शुक्रवारी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पालकांसाठी मोदक डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यामध्ये माधुरी पवार, रोहिणी सोनवणे, मनिषा काकुस्त, प्रिया भदाणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच, गणेशोत्सवातील दहा दिवसात शाळेअंतर्गत माळ डेकोरेटीव स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात नर्सरी – अजिंक्य देसले, शौर्य सोनवणे, वेद अहिरे, अनुश्री देशमुख, निधी सदर. युकेजी गोल्ड – धैर्या शेवाळे/ हितार्थ सोनवणे, प्रांजल नांद्रे / सिद्धांत जाधव, आरोही देवरे. युकेजी डायमंड – देवेश गवळे / पार्थ कांकरिया, निरज सोनवणे / पार्थ सोनवणे, विश्वजीत सोनवणे. युकेजी लोटस – शिवाजी सोनवणे / हर्षाली सोनवणे, आर्यन भदाणे, राजश्री अहिरराव, योगीराज सोनवणे, वैधवी भामरे. युकेजी रोझ – आरव देसले / प्रणित बागुल, रोहित पवार / अनामिका देसले, तनिष्का सोनवणे / रिषभ बारसे, चैतन्या शिंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

त्यानंतर, ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गुलाल उधळून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणा देत श्रींना निरोप देण्यात आला. यावेळी, स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्यासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले. यावेळी, शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + 16 =