चौफेर न्यूज मनात प्रेम भावना ठेवून केलेल्या तप साधनेने जीवनात आनंद व सुखाची प्राप्ती होती. सज्जन व्यक्ती शांत व संयमी असतात, दुर्जन व्यक्ती चिडखोर व शिघ्रकोपी असतात. माता पिता होणे हे नैसर्गिक व सामाजिक जबाबदारीने मिळणारी प्रतिष्ठा आहे. परंतू वीर पुरुषांचे माता पिता होणे हे अधिक अभिमानास्पद आहे. माता पिता हे मुलांचे रोल मॉडेल असले पाहिजे. गुरुजन व माता पित्यांना वंदन करणे हि भारतीय संस्कृती आहे. असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे विशेष प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, माणसाच्या भौतिक इच्छा पुर्ण करण्यातच जीवन संपते परंतू इच्छापुर्ती मात्र, संपत नाही. हिंसा, चोरी करणे जेवढे पाप आहे, तेवढेच मोहापायी अनावश्यक वस्तू व धनसंचय करणे म्हणजेच परिग्रह करणे पाप आहे. भौतिक इच्छावर ताबा मिळविण्यासाठी अध्यात्म मार्गदर्शन करते. अध्यात्मावर अधिष्ठान कठोर मिळविण्यासाठी तप साधना आवश्यक आहे. असे हि प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − nine =