तळेगाव दाभाडे,   ः  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तळेगाव दाभाडे आगारातील  240 कर्मचारी अघोषित संपावर गेले असून आगारातून सुटनाऱ्या 49 एस.टी बसगाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने याद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची मोठी तारांबळ झालेली दिसून येत आहे.

    महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी घोषित केलेला वेतन करार कोणत्याच कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्यातील सर्व कर्मचारी या कराराच्या निषेधार्थ मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
    तळेगाव आगारात एकूण  240 कर्मचारी आहेत. त्यापैकी  86 चालक, 78 वाहक,  22 प्रशासकीय  कर्मचारी तसेच वर्कशॉपमधील 37 कर्मचारी या संपात सहभागी असल्याची माहिती आगारप्रमुख व्ही.जी. अरगडे यांनी सांगितली.

    कर्मचाऱ्याच्या संपामुळे एस. टी. स्थानक ओस पडलेले असून 49 एस.टी बसगाड्या आगरामध्ये बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर नाशिक, बीड, कोल्हापूर, भगवानगड, तुळजापूर, औरंगाबाद, पंढरपूर, फौजी आंबवणे, बोरविली मुंबई, शिर्डी आणि स्थानिक मावळात मुकामासाठी जाणाऱ्या सर्व बसगाड्याही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तळेगाव आगारातून दररोज सर्व गाड्यांमधून सुमारे 36 हजार प्रवासी प्रवास करीत असतात. या सर्व प्रवाश्यांची अचानक झालेल्या संपामुळे मोठी प्रवासाची गैरसोय झाली.

यामध्ये दुग्धव्यवसायिक, भाजीपाला विक्रेते, तसेच तळेगाव आगारातून शिर्डी, तुळजापूर येथील देवस्थानाला अधिक मासामुळे एस.टी. द्वारे जाणाऱ्या भक्तांचा यामध्ये समावेश आहे.  अघोषितबंद सन्मानीय करार होईपर्यंत, कामगार चालू ठेवणार असल्याचे  या संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + twenty =