चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या ग प्रभागातील थेरगाव – तापकीरनगर परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून मैला मिश्रीत पाणी सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता साबळे यांना कल्पना देवूनही संबंधीत अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यांच्या कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे. याबाबत, पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त यांना निवदेन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरसेवकांच्या सांगण्यावरून सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडीत करायचा आणि दुसरीकडे सर्व सामान्य नागरीकांना मैलामिश्रीत पाणी पाजायचे. हा गंभीर प्रकार सध्या या भागात सुरु आहे. याबाबत येत्या पाच दिवसात या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी, असेही दाखले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × five =