चौफेर न्यूजनवरा मारहाण करतो, अशी तक्रार करणाऱ्या महिलांना तुम्हीही काठी घेऊन त्यांना मारहाण करा, असा सल्ला मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दिला आहे.

ग्वालियर जवळील अड़ूपुरा येथे सोमवारी आनंदीबेन यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मालती नावाच्या अंगणवाडी कार्यकर्तीने राज्यपालांकडे कैफियत मांडली. त्यांच्या गावात पुरुषांमध्ये दारू पिण्याचे प्रचलन असून तिचा पतीही दारू पितो. तिने मनाई केली तर मारहाण करतो, अशी तक्रार तिने केली. त्यावर गुजरातच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या आनंदीबेन यांनी “तुम्हीही काठी घेऊन त्यांना बदडून काढा,” असे मालती हिला सांगितले. तसेच व्यसनमुक्तीसाठी तुम्ही आंदोलन सुरू करा, असा सल्लाही त्यांनी या कार्यकर्त्यांना दिला.

आमच्या गावात दारूचे दुकान असून सर्व महिलांचा त्याला विरोध आहे. मात्र हे दुकान वजनदार लोकांचे असल्यामुळे त्या काही करू शकत नाहीत. या दारू दुकानाचा मालक गावातील लोकांना उधारीवर दारू पाजतो आणि घरी येऊन पैशासाठी गोंधळ घालतो, असे आम्ही राज्यपालांना सांगितल्याचे मालतीने ‘नईदुनिया’ वृत्तपत्राला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =