पिंपरी चिंचवड – महापुरुषांच्या जयंती उत्सवाचा अनावश्यक खर्च टाळुन  थेरगावमध्ये परिवर्तन सोशल फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी अंतर्गत फुफ्फुसीय कार्य चाचणी व दंत तपासणी शिबीर घेण्यात आले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या निमित्ताने डीजे,  डॉल्बी,  मिरवणुक व फ्लेक्स बाजी चा अनावश्यक  खर्च टाळून व कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी न घेता सभासदांच्या स्व: खर्चातून विधायक व सामाजिक उपक्रम राबवित महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी केली. रविवारी दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११  या वेळेत खिंवसरा पाटील विद्या मंदिर,  गणेशनगर या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. यामध्ये, १३०  विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य अधिकारी म्हणून दंतरोग तज्ज्ञ डॉ. विनय शेट्टी,  फुफ़्फ़ुस तज्ज्ञ डॉ. लाटने, डॉ. विष्णु जाधव, बंटी त्यागी यांनी काम पाहिले. मुख्याधापक नटराज जगताप यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. प्रसंगी, मान्यवरांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हे पुस्तक भेट देऊन करण्यात आला. शिबिराचे आयोजन परिवर्तन सोशल फाऊंडेशनचे दशरथ रणपिसे,  मयुर कांबळे, रोहित ढोबळे, राहुल जाधव, राकेश गवळी, सचिन क्षीरसागर, दत्ता एरंडे, तुषार कांबळे, संतोष शिंदे, राम गवळी, प्रकाश गायकवाड,  राहुल सरवदे,  गणेश रणपिसे आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − eight =