चौफेर न्यूज –  तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवारी (दि. १५) सुरुवात झाली. यानिमीत्त थेरगाव गणेश नगर येथील खिंवसरा पाटील विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढून स्वागत करण्यात आले.

गणेशनगर थेरगाव येथील परिवर्तन सोशल फ़ाउंडेशन व अखिल गणेशनगर युवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विदयमाने खिवंसरा पाटील विद्यामंदिर या शाळेमध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात व स्वागत हे नवचैतन्याने उत्साही वातावरणात केले जाते. परिवर्तन सोशल फ़ाउंडेशन व अखिल गणेशनगर युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने शाळेत ख़ाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनिकेत प्रभु, राहुल सरवदे यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याधापक नटराज जगताप, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, दशरथ रणपिसे, शंतनु तेलंग, सचिन क्षिरसागर, मयूर कांबळे, शुभम कूलकर्णी, तुषार कांबळे, रोहित ढोबळे, राहुल जाधव, राम गवळी, प्रकाश गायकवाड, राकेश गवळी, श्रीकांत धावारे, अंकुश कुदळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + six =