स्वच्छता फेरीतून शहर विद्रपीकरण मुक्तचा नारा

चौफेर न्यूज“थेरगाव सोशल फौंडेशन” मार्फत “गणेशनगर वॉक” हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात झाडांना खिळेमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. गणेश मंदिरापासून या उपक्रमाची सुरुवात झाली.

या उपक्रमाद्वारे गतिरोधक दर्शक फलकाचा अँगल सरळ करून रस्त्यातील खड्डा बुजण्यात आला. तसेच, गणेशनगर, लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, मयूरबाग कॉलनी या ठिकाणच्या विद्युत दिव्यांच्या खांबावरील अनधिकृतपणे करण्यात आलेल्या जाहिरातींचे स्टिकर्स, पोस्टर्स, पॅम्प्लेट्स, फ्लेक्स काढून सौंदर्यीकरणाला हातभार लावण्यात आला. त्याचबरोबर झाडांवरील बोर्ड्स, खिळे, तारा, स्टेपलर पिन्स, बाइंडिंग वायर्स काढून झाडांना खिळेमुक्त करण्यात आले.

हे सर्व काम करत असताना ज्या नागरिकांच्या घरासमोर हे विद्युत खांब, महावितरण डीपी व झाडे होते, त्यांना शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात आणि झाडांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जागरूक व सजग राहण्याचे आवाहन केले

त्यानंतर गणेशनगरचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या गणेश मंदिराजवळील वाहतूक कोंडी निवारण्यासाठी परिसरातील दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले. विक्रेत्यांनी न चुकता स्वतःहून जबाबदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. गणेशनगर वॉक या उपक्रमाचे आयोजन अनिकेत प्रभू, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर व सुशांत पांडे यांनी केले.

राहुल जाधव, जनक क़सबे, अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, मयूर गुंडगळ, मयूर कांबळे, प्रकाश गायकवाड, शंतनू तेलंग, शेखर गांगर्डे, स्वप्नील मंडल, अमोल शिंदे, रोहित ढोबळे, अभिजित खानविलकर, तुषार कांबळे, सचिन क्षीरसागर, दशरथ रणपिसे, दत्ता एरंडे, बापू खोसे, महेश येळवंडे, संकेत निकम, सुरज जोशी, पंकज पाटील, आनंद जाधव यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + 12 =