चौफेर न्यूज – थेरगाव सोशल फ़ाऊंडेशनने “थेरगाव सुधारण्यासाठी, २ तास आपल्या थेरगावसाठी” या उपक्रमा अंतर्गत दर रविवारी शहर विद्रुपीकरण हटाव मोहिम हाती घेतली आहे. त्याच अनुषंगाने रविवार दि. १७ जून रोजी डांगे चौक फ़्लाइओवर ब्रिज पिलरला लावण्यात आलेल्या जहिराती स्टिकर्स, पोस्टर्स, फ़्लेक्स तसेच पॉमप्लेट्स काढण्यात आले.

पिंपरी – चिंचवड महापलिकेने ६ वर्षापूर्वी शहराबाहेरील वाहतुकीचा परिणाम शहरातील वाहतुकीला होउ नये, या उद्देशाने गुज़रनगर ते ताथवडे हा डांगे चौकाचे वैभव असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल उभारला. परंतु, या उड्डाणपूलाच्या पिलर्सचा वापर क्लासेस, दवाखाने, विविध उपचार केंद्र, रियल इस्टेट, प्लेस्मेंट सर्विसेस, ऑफ़िसेस, हॉटेल्स अशा एक ना अनेक व्यावसायिक़ जाहिरातींसाठी करीत आहेत. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी थेरगाव सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

या मोहिमेत अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, अनिल घोडेकर, निलेश पिंगळे, सुशांत पांडे, मयूर कांबळे, निखिल माळी, अमोल शिंदे, राहुल जाधव, राकेश गवळी, तुषार कांबळे, रोहीत ढोबळे, प्रकाश गायकवाड, दत्ता एरंडे, दशरथ रणपिसे, श्रीकांत धावारे, अंकुश कूदळे, सचिन क्षिरसागर आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + 4 =