पिंपरी – चिंचवड महापालिकेचा निर्णय

चौफेर न्यूज –  शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे ४ कोटी ९५ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.‍

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी मधील ८०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या मात्र कागदपत्रा अभावी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यां पैकी कागदपत्राची पुर्तता करुन पात्र ठरलेल्या २७४ विद्यार्थांना बक्षीसपर रक्कम देण्यासाठी येणा-या सुमारे ३२ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळेमध्ये शिकणा-या दारिद्र्य रेषेखालील इयत्ता १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विदयार्थ्यांना सन २०१८ पासून अर्थसहाय्य म्हणून १ लाख रुपये, ८५ % ते ८९ % गुण मिळणाऱ्या विदयार्थ्यांना ५० हजार रुपये, ८० % ते ८४ % गुण मिळवणाऱ्या विदयार्थ्यांना २५ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर मध्ये ठिकठिकाणी चौकांमध्ये म्युरल्स बसविणे व सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ५८ लाख १० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडील कवडेनगर, काटेपुरम इत्यादी परिसरातील जुने पाईपलाईन बदलुन नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र से.क्र. २३ येथे पाणी शुध्दीकरण प्रक्रियेसाठी द्रवरुप क्लोराईड व पावडर पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ७२ लाख ७७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या विविध कार्यालयामध्ये इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी येणा-या सुमारे २८ लाख ७४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१९ (नवीन प्रभाग क्र.१६) मधील वाल्हेकरवाडी परिसरातील नाला बांधणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४९ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र २१ मध्ये ठिकठिकाणी नाले बांधण्यासाठी येणा-या सुमारे ५० लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे, इत्यादी भागामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे बांधकामाचे मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. नव्याने दाखल होणा-या गृह प्रकल्पाना काही काळ बांधकाम परवाना न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे पावसाळा सुरु झाला असून पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा विचारात घेवून त्यानंतर पूर्ववत बांधकाम परवाना देण्याच्या कारवाईस मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालयाकरीता मनपा मालकीची प्रेमलोक पार्क चिंचवड येथील शाळेची इमारतची जागा भाड्याने देण्यास मान्यता देण्यासाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. सभेच्या प्रारंभी दिवंगत कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर व भैयुजी महाराज यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 3 =