चौफेर न्यूजसभासद झाल्यास कंपनीमार्फत परदेश दौरा आणि येणार्‍या खर्चात ५० टक्क्‌यांची सूट देण्याचे आमिष दाखवून दहा जणांना नऊ लाख रूपयांना फसवल्याचा प्रकार रहाटणी येथे समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान रहाटणी येथे घडला.

याप्रकरणी महेश बळीराम हळंदे (वय ३६, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. तर संकेत शेखर गोपाळे, विजय शिवाजी कांबळे या कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल असलेले प्रिस्टीजा सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी चालवितात. कंपनीकडून सभासदांना देश-विदेशात पर्यटनासाठी पाठविण्याचे तसेच तिकडे थ्री व फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामध्ये सभासदांना तब्बल ५० टक्क्‌यांची सवलत मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी कंपनीत सुरूवातीला पैसे गुंतवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड परिसरात दहा नागरिकांनी आठ लाख ६० हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. ठरलेल्या कालावधीत सभासदांना कोणत्याही प्रकारे देश-विदेशात पर्यटनासाठी पाठविण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास वाकड पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 − 4 =