चौफेर न्यूज –

दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार क्लब, अवैध लॉटरी, हातभट्टी, अवैध ताडी, लॉज मधील वेश्या व्यवसाय, गुटखा, पॅगोची अवैध वाहतुक सर्रासपणे सुरु आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून दिघी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवासी नथ्थू पिराजी शिंदे यांनी केली आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अवैध्य धंद्याबाबत दिघी पोलिस स्टेशनला सात ते आठ तक्रार अर्ज केले. तसेच झोन फोन कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग, सामाजिक सुरक्षा विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारीचे अर्ज दिले. परंतु, पोलिस प्रशासनाकडून याबाबत कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. दिघी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मटका, कधी वडापाव दुकानात कधी सलुनच्या दुकानात चालतो. लॉजमध्ये मोबाईलवर फोटो दाखवून ग्राहकांना वेश्या पुरवल्या जातात. जुगार क्लब, हातभट्टी, अवैध्य ताडी जागा बदलून चालू आहे. अशा सर्व अवैध धंदे चालवणाऱ्या धंदे वाल्यांना एम.पी.डी.ए. लावण्याचे राज्यात विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९८१ मध्ये सुधारणा विधेयक शासनाने विधान परिषदेत नागपुर अधिवेशन २०१८ मध्ये मंजूर केले आहे. परंतु दिघी पोलीस स्टेशन शासनाच्या अधिनियम १९८१ च्या सुधारीत विधेयकाच्या विरोधात काम करत आहे. तसेच, मोठे हप्ते खाऊन दिघी पोलिस स्टेशन च्या हद्दीत, मटका, जुगार क्लब, अवैध लॉटरी, वेश्या व्यवसायावर अवैध ताडी, हातभट्टी अशा धंदेवाल्यांना मदत करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या ठिकाणी चालू आहेत अवैध धंदे –     

दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देहुफाटा व्यायाम शाळेजवळ, दिघीगाव दत्तनगर जवळ ममता स्वीट होम, तसेच तनिष कंट्रक्शन शेजारी मटका अड्डे चालु आहेत. देहुफाटा पेट्रोल पंप जवळ तसेच बारासू हॉटेल, दिघी जुना जकात नाकाजवळ जुगार क्लब चालु आहे. दिघीतील पोलीस स्टेशनच्या हद्दीत २७ लॉज चालु आहेत. अनेक लॉजमध्ये ५ ते २० मुली ठेऊन वेश्या व्यवसाय सर्रासपणे सुरु आहे. तसेच दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत डुडुळगाव, देहुफाटा, मॅगझीन चौक, आदर्श नगर, दत्तनगर, दिघी येथे हातभट्टी व ताडीचे १२ गुत्ते सुरू आहेत. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३२ लहान मोठे अवैध ढाबे सर्व प्रकारची दारु विकतात. देहुफाटा ते मोशी व देहुफाटा ते विश्रांतीवाडी मार्गावर २०० पॅजो गाड्या प्रत्येकी १० सिटे भरून वाहतुक करतात. पोलीस स्टेशन हप्ते घेऊन ओव्हर लोड गाड्या भरण्याचे काम याठिकाणी सुरु आहे. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ गुटखा होलसेलची गोडाऊन असून ७० पान टपरीवर गुटखा विक्री चालते. भाई लोकांची हप्ते वसुली अन्यथा दुकानदाराच्या गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार या ठिकाणी नवीन नाही. या संदर्भात पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी यांना तक्रार अर्ज दिले. तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुंडांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की व मारहाण केली. याबाबतही पोलिसांना तक्रार दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 18 =