चौफेर न्यूज

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या जयंती निमित्त निगडी येथिल त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसदस्या सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, चंदा लोखंडे, अश्विनी बोबडे, नगरसदस्य तुषार कामठे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे पुतळा परिसर सुशोभिकरण कामाचे भूमीपुजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 3 =