पिंपरी चिंचवड ः  दिवाळीनिमित्त फुलांना मागणी वाढली असली, तरीदेखील फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भाव स्थिर आहेत. गुलछडीच्या भावात वीस टक्के वाढ झाली आहे. तर झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर होऊनही भाव मात्र स्थिर आहेत. लग्नसराई सुरू होईपर्यंत फुल बाजारातील आवक कायम राहण्याची शक्यता फुलविक्रेत्यांनी वर्तविली आहे.
फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे ः झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)-30 ते 40 रुपये किलो, गुलछडी-100 ते 120 रुपये, लिली बंडल-8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल- 50 ते 60 रुपये, तुकडा गुलाब (डच ) 100 ते 120 रुपये, गुलाब गड्डी (साधा)- 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 60 ते 80 रुपये, अष्टर चार गड्डी- 12 ते 15 रुपये, अष्टर 80 ते 100 रुपये प्रतिकिलो, कागडा बंडल- 200 ते 250 रुपये, अबोली बंडल- 100 ते 120 रुपये. किरकोळ बाजारात कागडा गजर्‍याचा प्रति नगाचा भाव 10 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 10 =