कोकले आणि साक्रीतील वस्त्यांवर दिवाळी फराळाचे वाटप

साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार दि. ३ रोजी दिवाळी हा सण अश्विन शुद्ध त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, गोरगरिबांना फराळ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळी सणा निमित्ताने आकर्षक रांगोळीचे रेखाटन आणि सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर दिवाळीचे ग्रिटींग तयार केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील होते. यावेळी शाळेचे प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षिका स्मिता नेरकर यांनी केले. सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले.

चेअरमन प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून दिवाळी सणाविषयी माहिती सांगून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.  ते म्हणाले, दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सण’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्कृत मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो.  भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. “दिवाळी” रोषणाई,  उल्हास,  उत्सवाचा,  प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

दरम्यान, पाच दिवसांची मांडणी व पूजन करण्यात आले. यात वसुबारस, या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. त्यानिमित्ताने गोमातेची पूजा करण्यात आली.  तसेच, दिवाळी निमित्ताने वसुबारस, धनत्रीयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवसांविषयी महत्त्व नाटकाव्दारे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

त्यानंतर, शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी निमित्ताने कोकले आणि साक्री या गावातील गरीब वस्तीमधील मुलांना मिठाईचे तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी, गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =