पिंपळनेर – विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल नेहमीच प्रयत्नशिल राहिली आहे, शैक्षणिक वर्षात स्कूल व्यवस्थापनाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासावर भर देण्यात आला असून त्याचा विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक जिवनात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता देशातील सर्वोच्च पुरस्कारासाठी प्रयत्नशिल रहावे, असे मत प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेरच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी व्यक्त केले. प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या लाडे बोलत होत्या. प्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी, स्कूलचे समन्वयक राहुल अहिरे यांच्यासह रांगोळी स्पर्धेत विजयी स्पर्धक उपस्थित होते. दरम्यान, आनंद मेळाव्यात घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या पालकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तर, अनिता पाटील यांनी ग्रॅज्युएशन डे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अटेंडन्स अवॉर्ड स्विकारून शाळेविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सुंदर अशी रांगोळी व फलक लेखन करण्यात आले होते. सुत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. प्रचिती स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता पाटील यांनी केले. तसेच, मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी स्कूलच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − fourteen =