चौफेर न्यूज – संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन सर्वपक्षीय आणि सामाजिक धुरिणांनी पुकारले आहे. हा लाँग मार्च प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर निघणार असून या आंदोलनात शरद पवार, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल यासारखे नेते सहभागी होणार आहेत.

हा लाँग मार्च २६ जानेवारीला मंत्रालयाजवळच्या आंबेडकर पुतळ्यापासून गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. हा संविधान बचाव मार्च शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून निघणार आहे.

यामध्ये खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयूचे माजी नेते शरद यादव, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल, काँग्रेसचे गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणारे गणेश देवी सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =