साक्री – दैनिक सकाळतर्फे आयोजित फुल टू स्मार्ट २०१८ या स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सकाळच्यावतीने फुल टू स्मार्ट स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी हितेश भालचंद्र भदाणे याने प्रथम क्रमांकाचे बायसिकल हे पारितोषिक मिळविले. द्वितीय- कनिष्का शीतल देवरे (ट्रॅव्हलिंग बॅग), तृतीय क्रमांक – श्रेया राजेश कुवर (स्पोर्ट वॉच), चतुर्थ क्रमांक – देवेंद्र गणेश पगारे (वॉटर बॉटल) या विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त केले. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सकाळतर्फे बॅग देण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना स्कूलचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 15 =