साक्री : चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘द हॅप्पी प्रिन्स’ नाटिका सादर करत शिक्षकांसह पालकांचेही मन जिंकले. साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ही नाटिका सादर केली.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी लाल, पांढरा आणि गुलाबी रंगांचे ड्रेस परिधान केले. ‘क्रिसमस ट्री’च्या रेखाटनाने सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात पूजा भावसार, विना, स्वामिनी देवरे, पल्लवी वाघ, मृणाल देव या मुलींच्या सुमधुर आवाजात जिंगल बेल या गाण्याने करण्यात आली. चौथीची विद्यार्थिनी पूर्वा पाटील हिने नाताळबाबत मनोगत व्यक्त केले. चौथी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘बर्थ ऑफ जीजस क्राइस’ यावर आधारित नाटिका सादर केली.

यावेळी रांगोळीचे रेखाटन वैशाली पाटील, भाग्यश्री पाटील, स्मिता नेरकर, नीतू पंजाबी, वैशाली खैरनार, गीतल कोठावदे, स्वाती पाटील, प्रशांत ससले यांनी केले. चौथीतील युगंधरा देसले व संमुखी भामरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य संचालन अजीश  अ‍ॅलेक्स यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + thirteen =