साक्री : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग द्वारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने अटल आरोग वाहिनी आदिवासी जीवनदायनी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता एकात्मिक आरोग्य सेवा योजनेचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे कार्य क्षेत्रातील शासकीय आश्रम शाळा शिरसोले आणि बोपखेल तालुका साक्री, लौकी ता. शिरपूर या तिन्ही कलस्टला भारत विकास ग्रुपच्या रुग्णसेवा व वाहिकांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. प्रकल्प आधिकारी राजाराम हाळपे, प्रकल्प स्तरीय समितीचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, जि. प. सदस्य तुळशीराम गावीत, आदिवासी सेवक चैत्राम पवार, आकाश कुमार, मुबंई विश्वनाथ निसर्गन धुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा बहिरम शिरसोले, डॉ. उमेश साने, नितीन हिरे, वैद्यकीय अधिकारी नेहा पाटील यांच्या शुभ हस्ते शासकीय आश्रम शाळा शिरसोले याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. या रुग्णवाहिका द्वारा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व भारत विकास ग्रुप यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 48 कलस्टरच्या राज्यातील शासकीय आश्रम शाळा, एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थी यांच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. अटल आरोग्य वाहिनीची सेवा धुळे प्रकल्पातील शिरसोले बोपखेल लौकी कलस्टरच्या माध्यमातून धुळे प्रकल्पातील 22 शासकीय आश्रम शाळा व एकलव्य निवासी शाळेला मिळणार आहे.
धुळे प्रकल्पातील शिरसोले कलस्टरला रोहड, राईनपाडा, पांगन, नवापाडा, विहीरगाव तर बोपखेल कलस्टरला शेवगे, सुकापूर, वारसा, चरणमाळ, उमरपाठा, एकलव्य पिंपळनेर तसेच लौकी तालुका शिरपूर कलस्टरला उमर्दा, कोडीद, जमान्यापाडा, हिवरखेडा, अर्थे, शिरपूर, इंग्रजी माध्यम अक्कलकोस, सुलवाडे, महळसर आदी आश्रम शाळा जोडण्यात आल्याची माहिती प्रकल्प आधिकारी राजाराम हाळपे यांनी दिली. दरम्यान, तीनही अटल आरोग्य वाहिनींना फुलांनी सजवून त्यांचे पूजन करण्यात आले. प्रसंगी, महाराष्ट्र राज्यातील पहिले रुग्ण शिरसोले आश्रम शाळेची विद्यार्थीनी भारती ठाकरे हिची सकोल तपासणी रुग्णवाहिकेत करण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकांना हिरवी झेंडा दाखवून बोपखेल, लौकी येथे रवाना करण्यात आले. शिरसोले येथे सिकरूम वैद्यकीय अधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे फित कापून प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे, मोहन सूर्यवंशी, डॉ. तुळशीराम गावित, चैत्राम पवार यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. शासकीय आश्रम शाळा बोपखेल येथे रुग्ण वाहिका पोचल्यावर प्रकल्प आधिकारी राजाराम हाळपे, डॉ. तुळशीराम गावित, कक्ष अधिकारी सुनीता गायकवाड, सयाजीराव पारखे, सहायक कक्ष अधिकारी सरपंच सुमित्रा कुवर बोपखेल, संभाजी अहिरराव, जितेंद्र कुवर, अजित बागुल, केतन शिंदे, राजेंद्र पगारे आदींनी वाहिकेचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय खैरनार यांनी मानले.