चौफेर न्यूज – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात एक खास विक्रम भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिह धोनीने केला असून धोनीने या सामन्यात खेळताना रिझा हेन्ड्रिक्सचा झेल घेऊन टी-२० मध्ये सर्वात जास्त झेल टिपण्याचा विक्रम आपल्या नावे केला. टी-२० मध्ये २६२ डावात १३४ झेल यष्टीरक्षक म्हणून धोनीने टिपले आहेत. त्याने हा विक्रम करताना कुमार संगकाराचा १३३ झेलचा विक्रम मागे टाकला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये धोनी आणि संगकाराच्या पाठोपाठ १२३ झेलांसह भारताचाच यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − thirteen =