लोणावळा,  लोणावळा नगरपालिकेच्या वतीने पालिकेच्या वरसोली कचरा डेपोच्या येथे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण  450 करंज वृक्षाची मोठमोठे रोपं या ठिकाणी लावण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

    शुक्रवारी घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास  नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह उपनगरध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, निखिल कवीश्वर, भरत हरपुडे, सुधीर शिर्के, संजय घोणे, नगरसेविका सुवर्णा अकोलकर, गौरी मावकर, ब्रिनदा गणात्रा, आरोही तळेगावकर, मंदा सोनावणे, मुख्यधिकारी सचिन पवार, रायकर आणि नगरपालिकेचे कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

    लोणावळा नगरपालिकेच्या वतीने  स्वमालकीच्या असलेल्या वरसोली कचरा डेपोवर कोट्यवधी रुपये खर्चून विकासकामे करण्यात येत आहे. या संपूर्ण कचरा डेपोला उंच अशा सीमाभिंती बांधण्यात आल्या आहे.

याशिवाय येथे येणाऱ्या कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये, कचऱ्याचे ढीग उभे राहू नये यासाठी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रणाही याठिकाणी बसविण्यात येणार आहे. याच उपाय योजनांचा एक भाग म्हणून या कचरडेपोच्या चारही बाजूला सीमाभिंतीच्या आत कचऱ्याची दुर्गंधी तसेच हवेसोबत उडणाऱ्या कचऱ्याला रोखू शकेल अशा करंज वृक्षाचे रोपण करण्यात आले. इतर वृक्षांच्या तुलनेत लवकर वाढणारा आणि मोठा होणारा वृक्ष अशी करंजाची ख्याती आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + 11 =