पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकांना महापालिकेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती व्हावी, यासाठी विधिमंडळाच्या धर्तीवर एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवकांच्या कार्यालयात स्वीय सहायकांचा सक्रिय, अनमोल, महत्वाचा वाटा असतो. स्वीय सहाय्यक हे लोकप्रतिनिधींना समस्या मुक्त करण्यासाठीचे विस्तारित हात, कान, आणि डोळे असतात. त्यांच्या महत्वपूर्ण मदतीमुळे लोकप्रतिनिधींना आपले काम शिस्तबद्धपणे करणे सोपे जाते.
सर्व नगरसेवकांचे स्वीय सहाय्यकांना महापालिकेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती व्हावी. प्रशासनास अधिक सहकार्य घेता यावे. स्वीय सहायक हे महापालिका प्रशासन, पक्ष, जनसंपर्क कार्यालय आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वयकाची भुमिका पार पाडतात. स्वीय सहाय्यकांचा मानसन्मान वाढावा. कर्तव्यदक्षपणे सेवा देणार्‍यांचा गौरव करावा. यासाठी मुबंई येथील विधिमंडळाच्या धर्तीवर महापालिका मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील सभागृहात सर्व स्वीय सहाय्यकांचा एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्याची मागणी नगरसेवक वाघेरे यांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × two =