चौफेर न्यूज – प्रचिती प्री – प्रायमरी स्कूल सोमवारी नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजविण्यात आली होती. शाळांतर्फे विविध उपक्रम राबवून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी शिक्षकांनी मनोरंजनात्मक खेळ खेळून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रसंगी, प्राचार्या भारती पंजाबी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुगे देवून स्वागत केले.

तसेच, विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेवून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनात भर पाडण्यात आली. शाळेतील शिक्षक वर्गांनी मुलांसाठी रिंगण खेळ, धावणे, घोडस्वारी, विविध बालगीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यासह विद्यार्थी व शिक्षकांचा परिचय करून घेण्यात आला. संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 16 =