चौफेर न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटामधील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही प्राधिकरणातील सेक्टर.4 मध्ये मानस व्हिला इमारतीमध्ये मंगळवारी घडली. विजयकुमार अनंतपुर (वय-54, रा. प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अनंतपुर यांचा फ्लॅट मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कुलूप लावून बंद होता. या कालावधीत चोरट्यांनी दिवसाढवळ्या फ्लॅटचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील 2 लाख 49 हजार 600 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + nine =