निगडी : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 आणि नृत्यकला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कला क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणार्‍या युवतींचा गुणगौरव करणारा ‘युवती कला महोत्सव आणि सन्मान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आजच्या युवती भविष्यातील सक्षम महिला असणार आहेत, त्यासाठी युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या मनोहर सभागृहात शनिवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे. गायिका अभिनेत्री सायली राजहंस, पखवाज वादक अनुजा बोरुडे, नृत्य टीव्ही कलाकार  ऋतुजा जुन्नरकर यांचा सन्मान होणार आहे. तसेच त्यांच्या कलाविष्कारांचा अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे. कार्यक्रमासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ला रमेश शाह, उपप्रांतपाल ला ओमप्रकाश पेठे, ला अभय शास्त्री, ला हेमंत नाईक, आनंद मुथा, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 13 =