चौफेर न्यूज –  अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरणातील चौकाचे श्री अग्रसेन महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांच्या हस्ते फलकाचे नामकरण करण्यात आले.

यावेळी शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, विनोद बन्सल, रमेश बन्सल, जोगिंदर मित्तल, विजय गर्ग, सुनील आगरवाल, सुभाष आगरवाल, सुधीर आगरवाल, शकुंतला बन्सल, संजय आगरवाल, प्रेमचंद मित्तल, नरेश मित्तल, प्रवीण आगरवाल, संतोष आगरवाल आदी उपस्थित होते.

प्राधिकरणातील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बाजूच्या चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. याबाबतचा ठराव ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठकीत पारित करण्यात आला होता. तथापि, नामकरणाचा फलक लावण्यात आला नव्हता. अग्रसेन महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधत दोन दिवसापूर्वी श्री अग्रसेन महाराज चौक असा फलक चौकात लावण्यात आला. यासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 3 =