चौफेर न्यूज  ः प्राधीकरणामध्ये चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील पंचेचाळीस हजार किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. ही घटना प्राधिकरण निगडी येथे उघडकीस आली. मधुकर बाबासाहेब कांबळे (वय 33, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे शनिवार (दि. 29 डिसेंबर) ते शुक्रवार (दि. 4) या कालावधीत कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले दीड तोळ्याचे 45 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कांबळे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 11 =