चौफेर न्यूज ः निगडी येथील भक्ती- शक्ती समुहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारण्याची मागणी निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्प व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक हे शहरातील नागरिकांसाठी पर्यटन स्थळ असून शहरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात, येथे असणार्‍या देशातील सर्वात उंच भारताच्या झेंड्यामुळे देशातील नागरिकांची संख्याही येथे दिवसेंदिवस वाढतच आहे.
नुकतेच सुरू झालेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, याच चौकात सुरू असलेल्या भव्यदिव्य उड्डाणपुलामुळे व मंजुर असलेल्या मेट्रोमुळे या ठिकाणाला भविष्यात राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणाला सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ बनविण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ऐतिहासिक माहिती शिल्पातुन मिळावी. यासाठी भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे शिवसृष्टी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभा करण्यात यावी, अशी मागणी हतागळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + 11 =