पिंपरी चिंचवड ः मावळ लोकसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा खर्च सादर न केलेल्या 8 उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे. निवडणूक खर्च सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांच्या लेख्यांचा 15 एप्रिल, 20 एप्रिल  आणि 27 एप्रिल या तीन टप्प्यात तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांनी सोमवारी (दि.15) सादर केलेल्या खर्चाच्या तपासणी करण्याचे काम आयोगाकडून सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात खर्च सादर न केलेल्या 8 उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाठी 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 उमेदवारांनी माघार घेतली. तथापि, माघार घेतलेल्या उमेदवारांनीही आपला खर्च सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांनाही खर्च सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 1 =