चिंचवड ः रेड बुल या शितपेय बनवणार्‍या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करत एका 24 वर्षीय तरुणीला तीचे बँकेची माहिती घेऊन 1 लाख 15 हजार 459 रुपयांचा गंडा घातला. 1 मार्च 2019 ते 4 मार्च 2019 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. याप्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 1 मार्च ते 4 मार्च 2019 या कालावधीत वाकड येथे राहणार्‍या तरुणीला राजीव दिक्षीत, श्रीनिवास राव आणि एका अज्ञात महिलेने पाच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन रेड बुल इंडिया प्रा. लि. या कंपनीत काम लावण्याचे आमिष दाखवत तिच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्याची माहिती घेऊन बँक खात्यातील 1 लाख 15 हजार 459 रुपयांची रक्कम काढून घेत फसवणुक केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्‍वर साबळे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 6 =