चिंचवड ः  न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड च्या वतीने चिंचवड गावात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकर्‍यांच्या पोशाखात गळ्यात टाळ, डोकयावर तुळशी वृंदावन आणि मुखाने हरिनामाचा गजर करत, तसेच स्वछतेचे ठेवा भान आपला देश करू महान अशा घोषणा देत, पर्यावरणाचे महत्व सांगितले. न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड पासून चापेकर चौक ,गांधी पेठ मार्गे,चिंचवड बाजार पेठेतून दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक निळकंठ चिंचवडे, कार्यवाह सुनील चिंचवडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका योगिता बनकर, आदी उपस्थित होते. पालखीचे नियोजन गोरे नीता, जाधव शुभांगी यांनी तर सूत्रसंचालन परहर नंदा यांनी केले. पालखीमध्ये विद्यार्थांने संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत मीराबाई, मुक्ताबाई ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, विठ्ठल रुक्मिणी, यांची वेशभूषा साकारल्या होत्या, प्लास्टिकचा वापर बंद करा, ओला सुका कचरा वेगळा करा आणि पर्यावरणाला मदत करा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, स्वछतेचे ठेवा भान आपला देश करू महान अशा घोषणा देत विद्यार्थांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + six =