रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. रमाबाई यांच्या प्रतिमेस हेमा शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, मंजुळा मुदलियार, सामाजिक कार्यकरते तात्या शिनगारे, राजेश सुटे, राकेश भास्कर, रहीम शेख तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
रमाबाईंनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न धरता बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेले. बाबासाहेबांची समाजाप्रती तळमळ पाहुन त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, हि जाणीव प्रत्येकामध्ये असली पाहिजे तसेच मातोश्री रमाबाईची सहनशीलता, सोज्वळता त्यागी व वात्सल्यवृत्ती, कष्ट, कामसू निर्मळपणा, स्वाभिमानी आदी गुणांचा आदर करून हे गुण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत, असे मत यावेळी अरुण चाबूकस्वार यांनी व्यक्त केले. प्रियंका लाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर, रेणू राठी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 1 =