चौफेर न्यूज – राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांच्या गाडीचा रविवारी रात्री अंबेजोगाई शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला असून चौघे जखमी झाले आहेत.

रामेश्वर मुंडे त्यांच्या त्यांच्या कारमधून अंबेजोगाईच्या दिशेने जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील धनराज कचरू बिडगर यांचा मृत्यू झाला. तर रामेश्वर व्यंकटराव मुंडे ज्ञानोबा नाथराव कराड, विलास सोपान जाधव आणि परमेश्वर दवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रामेश्वर मुंडे पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 8 =