चौफेर न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परदेश दौऱ्यावरुन सतत टीका होत असते. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात असा विरोधक त्यांच्यावर आरोप करतात. मागच्या साडेचारवर्षांपासून सत्तेवर असलेले पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यासंदर्भात एक महत्वाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहेत. पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

त्याआधी पंतप्रधान मोदींनी आणखी दोन परदेश दौरे केले तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक परदेश दौरे करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरतील. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून ११३ देशांचे दौरे केले होते. पंतप्रधान म्हणून मोदींनी ९२ देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये काही देशांना त्यांनी पुन्हा पुन्हा भेट दिली आहे. पूर्वसुरि मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी यांचा फक्त एक दौर कमी आहे. पंतप्रधानपदावर असताना मनमोहन सिंग यांनी ९३ देशांचे दौरे केले होते. यामध्ये काही देशांना त्यांनी पुन्हा पुन्हा भेट दिली होती.

तिघांच्या परदेश दौऱ्यामध्ये फरक इतकाच आहे की, मोदींनी पाच वर्षांपेक्षा कमी काळात ९२ परदेश दौरे केले आहेत. तेच मनमोहन सिंग यांनी १० वर्षात ९३ देशांचे दौरे केले तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ११३ देशांना भेटी दिल्या. परदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसाठी खास आरक्षित विमान असते. हॉटलाइन सारख्या सुविधा असतात.

मोदींनी चार वर्ष सात महिन्यांच्या कार्यकाळात ९२ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण २०२१ कोटी रुपये खर्च आला. विमानाची देखभाल, चार्टर्ड विमाने आणि हॉट लाइन यासाठी २०२१ कोटी खर्च झाले.  यामध्ये पंतप्रधानांच्या हॉटेलचा खर्च आणि अन्य लवाजम्याच्या खर्चाचा समावेश नाही.

संपुआच्या दुसऱ्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांनी ५० देशांचे दौरे केले. त्यासाठी १३५० कोटी रुपये खर्च आला. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी ही माहिती दिली. २००९ ते २०१८ दरम्यानचा पंतप्रधानांचा परदेशातील दौरनिहाय खर्च सिंह यांनी दिला आहे. मोदींच्या प्रत्येक परदेश दौऱ्यासाठी २२ कोटींच्या घरात खर्च आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 4 =