पिंपरी ः भांडणाच्या रागातून चौघाजणांनी मिळून एका तरुणाला चामडी पट्याने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या डाव्या डोळ्यावर जबर मार बसला. यामुळे त्या तरुणाला त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली. ही घटना रविवार (दि. 28 एप्रिल) रोजी संत तुकारामनगर येथील अहिल्यादेवी होळकर मैदानाजवळ घडली. तौसिफ इक्कबाल खान (वय 28, रा. यशवंत चौक, वल्लभनगर, पिंपरी) असे मारहाणीत दृष्टी गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहीत मोटे (वय 19, रा. शनी मंदिराजवळ, संततुकारामनगर, पिंपरी) आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून रविवार (दि. 28 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास आरोपी रोहीत आणि त्याच्या तीन साथीदारांनी तौसिफ याला संत तुकारामनगर येथील अहिल्या देवी होळकर मैदानाजवळ अडविले. तसेच त्याला चामडी पट्याने जबर मारहाण केली. यादरम्यान तौसिफ याच्या डाव्या डोळ्याला जबर मार लागला आणि तो डाव्या डोळ्याने कायमचा दृष्टीहीन झाला. उपचारादरम्यान डोळा निकामी झाल्याने तौसिफ याने पिंपरी पोलीस ठाण्यात रविवार (दि.19) रोहीतसह तिघांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 18 =