चौफेर न्यूज दहावी  व  बारावीच्या  परीक्षार्थींना  अभ्यासावेळी  अखंडित  वीज  पुरवठा  करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी मुख्य अभियंता मल्लेश शिंदे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र बोर्ड व दिल्ली बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर सुरू झाल्या आहेत. यामध्ये बसणारे दहावी व बारावीचे परीक्षार्थीं पहाटे लवकर व रात्री उशीरापर्यंत अभ्यास करण्यात मग्न असतात. एकीकडे चांगला अभ्यास करून आईवडिलांची व स्वतःची स्वप्ने रंगविण्यात हि मुले हरखून गेलेली असतात. तसेच  सध्या उन्हाळा सुद्धा सुरु होत आहे व विजेची मागणी देखील वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी वीज गेल्यास त्या परीक्षार्थींचा हिरमोड होऊ शकतो. त्यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षाकाळात पुणे परिमंडलामध्ये अखंडित वीज पुरवठा कसा होईल. याबाबतचे नियोजन मुख्य अभियंता मल्लेश शिंदे यांनी करावे. यासाठी परिमंडलातील संबंधित सर्व विभागांना परीक्षा काळात अखंडित वीजपुरवठा करणेबाबत योग्य ती सूचना करावी, अशी मागणी पुणे जिल्हा विदुयत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी निवेदनाद्वारे  केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × three =