चौफेर न्यूज – दिघी ः आई-वडील आपले दैवत आहेत. त्यांची सेवा करावी. तसेच पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. आज पर्यावरण सुरक्षित राहिले तर पुढे मानव सुरक्षित राहणार आहे, असे मत हभप पूनम जाचक यांनी मांडले. संतनगर येथे भक्ती-शक्ती संगम उपक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात 37 वे पुष्प गुंफताना हभप जाचक यांनी कीर्तन सेवा सादर केली. यावेळी नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक संजय वाबळे, सभापती जयश्री डोके, सभापती विजय लोखंडे, प्रा. दिगंबर ढोकले, ग्रामीण साहित्यिक लक्ष्मण वाळुंज, सरपंच शरदशेठ वाळुंज, सरपंच महेंद्रशेठ वाळुंज, उद्योजक नवनाथ कोलते, पांडुरंग वाळुंज, साहेबराव गावडे, शिवराम काळे, हर्षद राठोड, राजेंद्र ठाकूर, अरुण इंगळे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे महत्व समर्पक दृष्टांत देऊन सांगितले. भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व संतनगर मित्र मंडळाच्या वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, नदी स्वछता, प्रदूषण, गडकिल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन या कामाची प्रशंसा केली. लोकांनी या पर्यावरण संवर्धनाच्या कामांना हातभार लावावा असे आवाहन देखील त्यांनी केले. संतनगर मित्र मंडळाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भक्ती-शक्ती संगम या उपक्रमांर्तगत वेदांताचार्य हभप सुभाष महाराज गेठे यांची प्रवचन सेवा असते. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या रविवारी कीर्तन असते. यावेळी कीर्तनाला साथ संगत श्री ज्ञानेश्‍वर प्रासादिक भजनी मंडळ खडकवाडी लोणी यांनी केली.

संतनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते भास्कर दातीर, अनिल जगताप, सतीश देशपांडे, चंद्रकांत थोरात, अनिल घाडगे, गणेश सैंदाणे, विजय जाधव, भारत सरडे, सरीन सागडे, बाबुलाल चौधरी, जगन्नाथ माने, रामलाल अहिर, अशोक पोटे, राजेश किबिले, नारायण बढेकर, मच्छिंद्र बुर्डे, मंदा मानकर, विमल शेळके, सरला हातेकर, शीतल करंजखिले, मंगल हिंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + 10 =