आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले पत्र

पिंपरी  – पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यात धरणातून पाणी न उचलता, ते रावेतच्या बंधा-यातून पिंपरी-चिंचवड शहरास उचलले जाते. मात्र, नदी पात्रातून उचललेले पाणी हा मंजूर पाण्याचा कोट्यातून वजा केले जात आहे. त्यामुळे शहराच्या मंजूर कोट्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या विचारात घेता राज्य शासनाकडून पाण्याचा मंजूर कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले. त्यात म्हटले आहे की,  रावेत बंधा-यातील नैसर्गिकरित्या आलेले पाणी उचलले तरी ते पाणी कोट्यामध्ये मोजले जाते. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून मंजूर केलेल्या महापालिकेच्या कोट्यावर परिणाम होतो. वस्तुत: पवना धरणातून धरण शंभर टक्के भरल्यानंतर  धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  जलसंपदा विभागाकडून पाण्याचा विसर्ग केला जातो.

यंदा पवना धरणातून विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरुन मनस्ताप सहन करावा लागता होता. विसर्ग कालावधीत उचलेले पाणी हे मनपाच्या मंजुर कोट्यातून वगळण्यात येवू नये. पिंपरी चिंचवड शहराची  वेगाने वाढणारी लोकसंख्या विचारात घेता राज्य शासनाकडून मंजूर कोटा वाढवून घेण्यात यावा. तरी विसर्ग कालावधीत नैसर्गिकरित्या रावेत बंधा-यात आलेले पाणी महापालिकेने उचललेस ते मनपा मंजूर कोट्यामधून वगळण्यात येण्यात यावे, किंवा मंजुर कोटा वाढवून मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्य शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, अशीही मागणी काटे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 1 =