चौफेर न्यूज : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नातू पार्थसाठी माढा लोकसभा मतदार संघातून घेतलेली माघार, पार्थला मावळ मतदार संघात दिलेली उमेदवारी, त्यानंतर दुसरा नातू रोहित पवारने आजोबांसाठी ‘निर्णयाचा पुनर्विचार’ करण्याची लिहीलेली भावूक पोस्ट…यामुळे पवार कुटुंबियांमध्ये मतभेद आहेत का? अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र असं काही नसून ‘मस्त चाललंय आमचं’ असा संदेश देणारा एक फोटो पवार कुटुंबियांनी फेसबुकवर शेअर केला आहे. ‘फन टाईम विथ फॅमिली’ कॅप्शन लिहीलेल्या या फोटोमध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि पार्थ पवार एकत्र दिसत आहेत.

माढा मतदार संघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार यांनी जाहिर केले. त्यांचे नाव जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. तसेच पार्थ पवारला उमेदवारी दिल्यास तो निवडून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी वर्तवला. या सगळ्यामध्ये पवार कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून चाललेल्या रस्सीखेचवरून चर्चा रंगल्या होत्या. मात्र नातवासाठी अखेर शरद पवार यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहिर केले. तसेच राष्ट्रवादीकडून पार्थचे मावळ मतदारसंघात उमेदवार म्हणून नावही जाहिर करण्यात आले.

काय म्हटलं होतं रोहितने फेसबुक पोस्टमध्ये

शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर रोहितने फेसबुक पोस्ट लिहून ‘निर्णयाचा पुनर्विचार’ करण्यास सांगितले. एक कार्यकर्ता म्हणून, ‘साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − five =